'छम्मकछल्लो' म्हणाल, तर तुरूंगात जाल!


'छम्मकछल्लो' म्हणाल, तर तुरूंगात जाल!
SHARES

बॉलिवूडच्या गाण्यांमध्ये भलेही 'छम्मकछल्लो' हा शब्द सर्रासपणे वापरला जात असला, तरी एका महिलेला उद्देशून हा शब्द वापरणे ठाण्यातील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. स्थानिक न्यायालयाने या व्यक्तीला एका दिवसाची सर्वसाधारण कैद आणि १ रुपयांचा प्रतिकात्मक दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

या महाभागाने आपल्या शेजारी राहणाऱ्या महिलेला उद्देशून हा शब्द उच्चारला होता. महत्त्वाचे म्हणजे तब्बल ८ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे. हा शब्द महिलांना अपमानित करणारा असल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.

सन १९९६ मध्ये आलेल्या सनी देओल आणि करिष्मा कपूर यांच्या 'अजय' आणि शाहरूख खानच्या 'रा वन' या सिनेमातील गाण्यात 'छम्मकछल्लो' शब्दाचा उल्लेख आहे.



कशी घडली घटना?

९ जानेवारी २००९ रोजी तक्रारदार महिला आपल्या पतीसोबत मॉर्निंग वॉक करून घरी परतत होती, त्यावेळेस तक्रारदार महिलेचा पाय आरोपीने शिडीवर ठेवलेल्या कचरापेटीला लागला. यामुळे रागावलेल्या आरोपीने महिलेला उलटसुलट बोलताना 'छम्मकछल्लो' असे संबोधले. ही बाब खटकल्याने या महिलेने थेट जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. परंतु पोलिसांनी शेजाऱ्याविरोधात तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याने या महिलेने अखेर न्यायालयाकडे दाद मागितली.


कलम ५०८ अंतर्गत

तब्बल आठ वर्षे या खटल्याची सुनावणी सुरू होती. न्या. आय. टी. इंगोले यांनी गेल्या आठवड्यात यासंदर्भात महिलेच्या बाजूने निर्णय दिला. आरोपीने भा.दं.वि. च्या कलम ५०९ (विनयभंग करण्याच्या उद्देशाने हावभाव किंवा शब्दोच्चार करणे ) अंतर्गत गुन्हा केला आहे. 'छम्मकछल्लो' या हिंदी शब्दाला इंग्रजीत पर्याय उपलब्ध नाही. हा शब्द महिलांचे कौतुक करणारा नाही, तर अपमानीत करणारा असल्याचे मत, न्यायालयाने निकालात नोंदवले आहे.



हे देखील वाचा -

जसलोक रुग्णालयात विद्यार्थिनीने का केली आत्महत्या?


 

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा