नवरा-बायकोच्या भांडणात मध्यस्थी केल्याने तरूणाचा खून

दोघांमध्ये समझोता करण्यासाठी नदीम मोमीनने पुढाकार घेतला. त्यामुळे इम्रानचा गैरसमज झाला. नदीममुळेच आपली पत्नी घरी येत नसल्याचा इम्रानचा समज झाला.

नवरा-बायकोच्या भांडणात मध्यस्थी केल्याने तरूणाचा खून
SHARES

नवरा-बायकोचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका समाजसेवक तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे. वादात मध्यस्थी केल्याने भिवंडीत नदीम मोमीन याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. इम्रान सय्यद असं आरोपीचं नाव आहे. 

भिवंडीतील अजंटा कंपाऊंडमध्ये इम्रान सय्यद आणि त्यांची पत्नी राहत होते. दोघांमध्ये चालू असलेल्या वादामुळे ते वेगवेगळे राहत होते. दोघांमध्ये समझोता करण्यासाठी नदीम मोमीनने पुढाकार घेतला. त्यामुळे इम्रानचा गैरसमज झाला. नदीममुळेच आपली पत्नी घरी येत नसल्याचा इम्रानचा समज झाला. त्यातून त्याने मित्राच्या मदतीने नदीमचा खून केला. 

मध्यरात्रीनंतर नदीम बाईकरून मोबाईलच्या दुकानातून घरी जात होता. यावेळी इम्रान आणि त्याच्या मित्रानं त्याला वाटेत अडवलं. बाईकरून नदीमला खाली पाडून दोघांनी त्याच्यावर चाकूने वार केले. जवळच असलेल्या नदीमचे मित्र त्याला वाचवण्यासाठी धावून आले. दोघे पळून जाऊ लागताच इम्रानला त्यांनी पकडले. यावेळी जमा झालेल्या जमावाने त्याला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. दुसरा हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला. जखमी नदीमला वंजारपट्टी नाका येथील सिराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता डाॅक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. 

भोईवाडा पोलिसांनी दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. नदीम हा परिसरात समाजसेवक म्हणून परिचित होता. २०१७ मधील महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याने लढविली होती



हेही वाचा -

हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडताना तरुणीचा मृत्यू

परदेशात नोकरीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा