हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडताना तरुणीचा मृत्यू

कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडताना एका तरूणीला आपला जीव गमवावा लागला आहे.

हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडताना तरुणीचा मृत्यू
SHARES

कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडताना एका तरूणीला आपला जीव गमवावा लागला आहे. लोकल ट्रेनने दिलेल्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला. अनु दुबे (२३) असं या तरुणीचं नाव आहे. कल्याण स्थानकात ही घटना घडली. 

अनु कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत होती. त्यामुळे तिला लोकल आल्याचं समजलं नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येणाऱ्या लोकलने तिला धडक दिली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूला रेल्वेकडून समांतर भिंत बांधण्याचं काम सुरू आहे. हे काम अपूर्ण आहे. त्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी भिंत नसलेल्या जागेतून प्रवासी ये-जा करत असतात. वेळ वाचवण्यासाठी रोज शेकडो प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडतात. याच वाटेने जात असताना या तरूणीला लोकलने धडक दिली. रेल्वे पोलिसांनी अनु दुबेच्या मृत्यूची अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

रूळ ओलांडून न जाण्याचं आवाहन रेल्वे प्रशासन वारंवार प्रवाशांना करते. याबाबत अनेकदा जनजागृतीही केली आहे. मात्र, अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडतात. रूळ ओलांडताना यापूर्वी अनेकांचा बळी गेला आहे. तर कानात हेडफोन घालून प्लॅटफार्मवरून जात असताना मागून लोकल आल्याचं न समजल्यानेही अनेकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. 



हेही वाचा -

परदेशात नोकरीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

आयकर विभागाच्या कारवाईची भीती दाखवून व्यापाऱ्याला गंडा




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा