आयकर विभागाच्या कारवाईची भीती दाखवून व्यापाऱ्याला गंडा

आरोपीने मिनिस्ट्री आँफ काँर्पोरेट अफेअरच्या नावाने बनावट ई-मेल आयडी बनवून त्या वरून व्यापाऱ्याला मेल केले होते.

आयकर विभागाच्या कारवाईची भीती दाखवून व्यापाऱ्याला गंडा
SHARES

आयकर विभागाच्या कारवाईची भिती दाखवून व्यापाऱ्याला ३ लाखांचा गंडा घालणाऱ्यास सायबर सेलच्या पोलिसांनी अटक केली आहे. मनिष दुबे असे या आरोपीचे नाव आहे. मनिष विरोधात मुंबई,नवीमुंबईच्या पोलिस ठाण्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासातून पुढे आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबईत राहणाऱ्या या व्यापाऱ्याला काही दिवसांपूर्वी एक मेसेज आला होता. त्यात त्याला आयकर विभागाला परताव्याची रक्कम न भरल्यास दंड भरावा लागेल, सुरूवातीला व्यापाऱ्याने त्या मेसेज आणि मेलकडे दुर्लक्ष केले. मात्र कालांतराने वारंवार अशा प्रकारे मेसेज येऊ लागल्यानंतर व्यापाऱ्याने त्या मेलवर दिलेल्या खात्यावर साडेतीन लाख रूपये भरले. मात्र पैसे भरल्यानंतर ही वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात होती. त्यावेळी व्यापाऱ्याला संशय आल्याने त्याने चौकशी केली. त्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने मुंबई पोलिसांच्या सायबर सेल विभागाकडे तक्रार केली होती.

हेही वाचाः- मागील ६ महिन्यात महानगरातील घरांच्या विक्रीत घट

त्या तक्रारीनुसार पोलिसांनी १० डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली. व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार तपासात आरोपीने मिनिस्ट्री आँफ काँर्पोरेट अफेअरच्या नावाने बनावट ई-मेल आयडी बनवून त्या वरून व्यापाऱ्याला मेल केले होते. पोलिसांनी तांत्रिकदृष्टा तपासकरून मनिषला ताब्यात घेतले.  त्याच्याचौकशीतून त्याचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित झाल्यानंतर  पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत पुढे मनिषने अशा प्रकारे अनेकांना गंडवले असून त्याच्या विरोधात मुंबईसह नवीमुंबईत ही गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात पुढे आले. न्यायालयाने मनिषला पोलिस कस्टडी सुनावली आहे.   

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा