Advertisement

मागील ६ महिन्यात महानगरातील घरांच्या विक्रीत घट

नव्या गृहप्रकल्पामुळं उपलब्ध घरांच्या संख्येत मुंबई महानगरात गेल्या ६ महिन्यांत वाढ झाली आहे.

मागील ६ महिन्यात महानगरातील घरांच्या विक्रीत घट
SHARES

मागील अनेक महिन्यांपासून नवीन गृहप्रकल्प मुंबईसह उपनगरात येत आहेत. या गृहप्रकल्पामुळं उपलब्ध घरांच्या संख्येत मुंबई महानगरात गेल्या ६ महिन्यांत वाढ झाली आहे. परंतु, असं असलं तरी विक्रीत मात्र घट झाल्याची माहिती समोर येत आहे. तसंच, परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पातही कमालीची वाढ झाली आहे. यामुळं या घरांनाही मागणी नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

३६ टक्के वाढ

मुंबई महानगर परिसरातील घर खरेदी-विक्रीचा मागील ६ महिन्यांतील अहवाल 'नाईट फ्रँक'नं जाहीर केला आहे. या अहवालानुसार, महानगरात ७९ हजार ८१० घरं नव्यानं विक्रीसाठी उपलब्ध झाली. या काळात फक्त ३५ हजार ९८८ घरांची विक्री झाली. मुंबई महानगरात काही मोठ्या विकासकांनी गृहप्रकल्पांची घोषणा केल्यामुळं मागील ६ महिन्यांत उपलब्ध घरांच्या संख्येत ३६ टक्के वाढ झाल्याची माहिती अहवाल देण्यात आली आहे.

घरांची विक्री

परंतु, यावेळी महानगरातील घरांची विक्री चांगलीच रोडावली. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात १४ टक्के घट झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. महानगरातील न विकल्या गेलेल्या घरांची संख्या एक लाख ४५ हजार ३०१ इतकी असल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

'या' एक्स्प्रेसमधील नाश्त्यामध्ये बुरशी आलेले ब्रेड-बटर

एमएमआरडीए उभारणार ३ मेट्रो मार्गांसाठी एकच कारडेपो



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा