Advertisement

एमएमआरडीए उभारणार ३ मेट्रो मार्गांसाठी एकच कारडेपो

एमएमआरडीए ३ मेट्रो मार्गांसाठी मिळून एकच कारडेपो उभारत असल्याची माहिती समोर येत आहे.

एमएमआरडीए उभारणार ३ मेट्रो मार्गांसाठी एकच कारडेपो
SHARES

एमएमआरडीए ३ मेट्रो मार्गांसाठी मिळून एकच कारडेपो उभारत असल्याची माहिती समोर येत आहे. ३ मेट्रो मार्गांसाठी दुमजली कारडेपो चेंबूरच्या मंडाळे इथं उभारण्यात येणार आहे. या कारडेपोसाठी ३१ हेक्टर जागेचा वापर केला जात आहे. तसंच, या कारडेपोला 'स्टेट ऑफ द आर्ट कारडेपो' असे संबोधले जात आहे.

७१ गाड्या पार्क

या कारडेपोमध्ये ८ डब्यांच्या ७१ गाड्या 'पार्क' करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. तब्बल ५७६ डबे इथं  पार्क केले जाऊ शकतात. गाड्यांची दैनंदिन देखभाल तसंच दुरुस्तीसाठी ९ अद्ययावत वर्कशॉप असणार आहेत. या वर्कशॉपमध्ये ८ व ६ डब्यांच्या गाड्या उभ्या राहू शकतात. गाड्या धुतल्यानंतर दूषित पाण्यावर प्रक्रिया तसंच पाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्पही या डेपोत असणार आहे. गाड्या धुण्यासाठी अद्ययावत यंत्रणा असणार आहे. गाड्या उभ्या करण्यासाठी डेपो अंतर्गत तब्बल २७ किमीचा ट्रॅक असणार आहे.

३ मेट्रो मार्ग

'दहिसर ते डी. एन. नगर’, 'डी. एन. नगर ते मंडाळे' व 'दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व' या ३ मेट्रो मार्ग एमएमआरडीए एकच कारडेपो उभारत आहे. या मार्गांसाठीची बांधकामंही सुरू करण्यात आली आहेत. पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर व हार्बर मार्ग असे ३ विभाग या मेट्रो मार्गांनी जोडले जाणार आहेत. त्यामुळे तिन्ही विभागातील दळणवळण अधिक जलद होणार आहे. मंडाळेच्या पुढे हे मार्ग भविष्यात नवी मुंबई मेट्रोलाही जोडले जाणार आहेत. त्यामुळं मुंबई व नवी मुंबईतील अंतर अधिक कमी होऊन प्रवास जलद होणार आहे.



हेही वाचा -

भारत बंद; २५ कोटी कामगारांचा देशव्यापी संपावर

'या' एक्स्प्रेसमधील नाश्त्यामध्ये बुरशी आलेले ब्रेड-बटर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा