पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीची हत्या, दीड वर्षानंतर गुन्हा उघडकीस

वसईमध्ये दीड वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

SHARE

वसईमध्ये दीड वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने आपल्या पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीची हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. महाबुबुर रहमान शेख असं या आरोपीचं नाव आहे. 

महाबुबुर रहमान शेख याने दीड वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीची हत्या केली होती. पॉली शेख असं हत्या झालेल्या दुसऱ्या पत्नीचं नाव आहे. हत्येनंतर महाबुबुरची पहिली पत्नी सीमा शेखही फरार आहे. महाबुबुरने घरातच गळा दाबून पत्नीची हत्या केली होती. त्यानंतर सीमाच्या मदतीने त्याने पॉलीचा मृतदेह गोणीत भरुन मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सातिवली खिंड येथील झाडाझुडपांमध्ये फेकला होता. त्यानंतर दोघेही फरार झाले होते. 

 हत्येनंतर सहा महिन्यांनी जंगलात एका गोणीत भरलेला महिलेच्या हाडांचा सांगाडा एका आदिवासी महिलेला दिसला. तिने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सापडलेल्या हाडाच्या सांगाड्याची ओळखही पटत नव्हती. दरम्यानच्या काळात ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने  महाबुबुरला चोरीच्या गुन्ह्यात पकडलं होतं. चौकशीत त्याने दुसऱ्या पत्नीची हत्या करुन मृतदेह वसई हद्दीत फेकला असल्याची कबुली दिली. त्यामुळे दीड वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा झाला. वालीव पोलिसांनी महाबुबुरचा ताबा घेतला असून कोर्टाने त्याला ६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हेही वाचा -

पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला खंडणीप्रकरणी अटक

मुंबई महापालिका करणार २२८ मालमत्ता जप्त
संबंधित विषय
ताज्या बातम्या