Advertisement

मुंबई महापालिका करणार २२८ मालमत्ता जप्त

डिसेंबर महिना उलटून गेला तरी मालमत्ता कराची अपेक्षित वसुली झालेली नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.

मुंबई महापालिका करणार २२८ मालमत्ता जप्त
SHARES

डिसेंबर महिना उलटून गेला तरी मालमत्ता कराची अपेक्षित वसुली झालेली नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. २२८ मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. या सर्व मालमत्तांकडं ५८१ कोटी ११ लाख रुपयांचा कर थकीत आहे. या मालमत्तांनी करांचा भरणा न केल्यास त्यांचा लिलाव करण्यात येईल.

निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक, खुली जागा, शासकिय, शैक्षणिक अशा विविध वर्गवारी अंतर्गत असणाऱ्या थकबाकीदार मालमत्तांचा यामध्ये समावेश आहे. मालमत्तांचा लिलाव टाळण्यासाठी मालमत्ता विषयक कराचा भरणा मुदतीतच करावा, असं आवाहन महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यातर्फे करण्यात आलं आहे. मालमत्ता कराची देयके मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत मालमत्ता कर महापालिकेकडं जमा करणं आवश्यक असतं. या कालावधीत कर न भरल्यास पालिकेकडून टप्पेनिहाय कारवाई सुरू करण्यात येते. 

यामध्ये सर्वप्रथम महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून कर भरण्यासाठी पाठपुरावा करतात. तरीही कर न भरल्यास 'डिमांड लेटर' पाठविले जाते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात २१ दिवसांची अंतिम नोटीस मालमत्ता धारकास दिली जाते. थकबाकीदारांवर केल्या जाणाऱ्या कारवाईत प्रामुख्याने पाणी तोडणे, जप्ती, लिलाव इत्यादी बाबींचा समावेश आहे.



हेही वाचा -

बेस्टच्या ताफ्यात २५ मिडी बस दाखल

पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला खंडणीप्रकरणी अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा