बेस्टच्या ताफ्यात २५ मिडी बस दाखल

युवासेना प्रमुख व महाराष्ट्राचे नवे मंत्री आदित्य ठाकरे यांनी या बसचं उद्घाटन केलं.

  • बेस्टच्या ताफ्यात २५ मिडी बस दाखल
  • बेस्टच्या ताफ्यात २५ मिडी बस दाखल
SHARE

बेस्ट प्रवाशांच्या सेवेत २५ मिडी बस लवकरच दाखल होणार आहेत. या २५ मिडीबस वडाळा डेपोमध्ये दाखल झाल्या आहेत. युवासेना प्रमुख व महाराष्ट्राचे नवे मंत्री आदित्य ठाकरे यांनी या बसचं उद्घाटन केलं. बेस्टनं याआधी आपल्या ताफ्यात १२ बस मिडी दाखल केल्या होत्या.

२५ मिडी बस

नव्या २५ मिडी बसबाबत आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून माहिती दिली. लवकरच या बस मुंबईच्या रस्त्यांवर धावणार आहेत. मुंबईकरांचा या बेस्टला मिळणारा प्रतिसाद पाहता या बसलाही प्रतिसाद मिळणार आहे. वडाळा डेपोमध्ये दाखल झालेल्या या बस फुलांनी सजविण्यात आल्या होत्या.

संबंधित विषय
ताज्या बातम्या