चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या


चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या
SHARES

मुलुंड - चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना मुलुंडमध्ये गुरुवारी उघडकीस आली. जयेश म्हादलेकर (35) असे आरोपीचे नाव असून तो मुलुंडच्या अंबिका चाळ येथे पत्नी श्रेया म्हादलेकर हिच्यासोबत राहत होता. चारित्र्याच्या संशयावरुन या दोघांमध्ये नेहमीे खटके उडत होते. गेल्या पंधरा दिवसांपासून श्रेया माहेरी गेली होती. गुरुवारी सकाळी तिला जयेशने बोलावून घेतले. त्यानंतर पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. याच दरम्यान आरोपीने लोखंडी रॉडने वार करत पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याने पळ काढला. या घटनेबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात जयेश विरुद्ध गुन्हा नोंदवला गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा