कुर्लाच्या पादचारी पुलावर चाकू हल्ल्याचा थरारक व्हिडिओ वायरल

काहींना नेमके काय सुरु आहे, हे कळतच नाही. ते जाणून घेण्यासाठी प्रसंग पाहत काहीजण उभे राहिले. तर काहीजण प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत तेथून काढता पाय घेतला.

कुर्लाच्या पादचारी पुलावर चाकू हल्ल्याचा थरारक व्हिडिओ वायरल
SHARES

मुंबईच्या कुर्ला रेल्वे स्थानक आणि पादचारी पुलावर प्रवाशांची कायम वरदळ असते. अशा वरदळीत भर दुपारी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर चाकूने हल्ला केल्याचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. २८ नोव्हेंबरची ही घटना असून हा हल्ला पैसे उकळण्यासाठी नाही तर व्यक्तीला ठार मारण्यासाठी किंवा जखमी करण्यासाठी झाला असल्याचे पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

 कुर्लाच्या पादचारी पुलावरुन शनिवारी एक व्यक्ती चालत असताना, दुसऱ्या व्यक्तीने मागून येऊन अचानक चाकू हल्ला केला. या हल्ल्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. त्यानंतर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने तेथून पळ काढला. तर हल्ला होणारा इसमही तेथून निघून गेला. मात्र हा सर्व प्रसंगात आजूबाजूचे लोक मात्र चांगलेच बिथरले. काहींना नेमके काय सुरु आहे, हे कळतच नाही. ते जाणून घेण्यासाठी प्रसंग पाहत काहीजण उभे राहिले. तर काहीजण प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, या हल्लामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र दिवसाढवळ्या अशा प्रकराचे हल्ले होणे गंभीर आहे. गेल्या वर्षी गाजियाबाद येथे अशा प्रकारची धक्कादायक घडली होती. एका डेन्सिस्टने एका महिलेवर चाकूने हल्ला केला आणि तिच्या पाळीव कुत्र्याला पायाने दाबण्याचा प्रयत्न केला. तसंच हल्ले महिखोराने महिलेशी गैरवर्तवणूक करत तिच्या मुलीलाही मारण्याचा प्रयत्न केला,

हेही वाचाः- कोरोनाची लस सर्वातआधी कोणाला मिळणार? आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

Read this story in हिंदी
संबंधित विषय