Advertisement

कोरोनाची लस सर्वातआधी कोणाला मिळणार? आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

जगातील इतर देशांत आणि भारतात देखील कोरोना (covid19) विषाणूवरील लशीची चाचणी अंतिम टप्प्यात आलेली असताना ही लस सर्वात आधी कुणाला मिळणार अशी चर्चा रंगू लागली आहे.

कोरोनाची लस सर्वातआधी कोणाला मिळणार? आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट
SHARES

जगातील इतर देशांत आणि भारतात देखील कोरोना (covid19) विषाणूवरील लशीची चाचणी अंतिम टप्प्यात आलेली असताना ही लस सर्वात आधी कुणाला मिळणार अशी चर्चा रंगू लागली आहे. प्रभावशाली व्यक्ती इतरांच्या आधी ही लस मिळवण्यात यशस्वी होतील का? त्यानंतर सर्वसामान्यांना क्रमांक येईल का? महाराष्ट्रात देखील हीच स्थिती असेल का? असे अनेक प्रश्न राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारण्यात आले. 

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे (rajesh tope) यांनी या शक्यतांना फेटाळून लावलं. राजकारणी, उद्योजक, सेलिब्रिटी असोत वा कुठलीही प्रभावशाली व्यक्ती असोत, कोणी कितीही मागणी केली तर कोरोनाची लस ही प्राधान्यक्रमाने कोविड योद्ध्यांनाच सर्वात आधी उपलब्ध करून दिली जाईल, असं परखड मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा- जुलै-ऑगस्टपर्यंत २५-३० कोटी लोकांना कोरोना लस देण्याचा प्रयत्न

भारतात आणि जागतिक स्तरावर कोरोना लशीची चाचणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. अनेकांनी या चाचणीत सहभागी होण्याची इच्छा देखील व्यक्त केलेली आहे. परंतु अद्याप आम्हाला सर्वप्रथम कोरोनावरील लस मिळावी, अशी मागणी केलेली नाही. अनेक कंपन्या कोविडवरील लस बाजारात उतरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु ही लस पूर्ण खातरजमा केल्यानंतर मागवणे आणि तिचा योग्य प्रमाणात पुरवठा करणे, त्यासंबंधी प्रोटोकाॅल बनवणे यावर संपूर्ण नियंत्रण प्रामुख्याने केंद्र सरकार आणि बरोबरीने राज्य सरकारचं देखील असेल, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. 

महाराष्ट्रात (maharashtra) सर्वात पहिल्यांदा कोविड लस कुणाला द्यायची याकरीता यादी तयार करण्याचं काम सुरू आहे. राज्य सरकारच्या निकषांनुसार राजकारणातील पुढारी मंडळी ही सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कोरोना सेवकांच्या प्राधान्यक्रमाच्या कार्यकक्षेत येत नाहीत. त्यामुळे डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि कोरोना संबंधीत काम करणाऱ्या सेवकांनाच प्राधान्यक्रमाने ही लस दिली जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

(maharashtra health minister rajesh tope clears about covid vaccine priority groups)

हेही वाचा- सायन रुग्णालयात 'कोव्हॅक्सिन'ची चाचणी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा