Advertisement

coronavirus updates: सायन रुग्णालयात 'कोव्हॅक्सिन'ची चाचणी

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणी करण्यात येणार आहे.

coronavirus updates: सायन रुग्णालयात 'कोव्हॅक्सिन'ची चाचणी
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन  लसीच्या मानवी चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीसाठी मुंबई पालिकेच्या सायन रुग्णालयाची निवड करण्यात आली. या चाचणीत सहभागी होण्यासाठी जवळपास ३००हून अधिक जणांनी सायन रुग्णालय प्रशासनाकडं नोंदणी केली आहे. लसीची चाचणी सुरू करण्यासाठी एथिकल कमिटीकडून रुग्णालयाला मान्यता मिळाली आहे. मंगळवारपासून इथं चाचणी सुरू होणार आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही)च्या मदतीनं विकसित केलेल्या देशी लसीच्या चाचणीसाठी भारत बायोटेकनं महापालिकेच्या सायन रुग्णालयाची निवड केली आहे. देशभरातील २५ केंद्रांमध्ये २६ हजारांहून अधिक स्वयंसेवकांवर ही चाचणी करण्यात येणार आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात २००-३०० व्यक्तींना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचं परीक्षण करून चाचणीबाबत पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. सायन रुग्णालयात लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होणार असल्याचं मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केलं.

ही फेज-३ चाचणी असल्यानं हजाराहून अधिक स्वयंसेवकांवर ती करावी लागणार आहे. आतापर्यंत ३०० लोक लस घेण्यास उत्सुक आहेत. चाचणीसाठी एकूण स्वयंसेवकांपैकी २० टक्के सहभाग अतिजोखमीचे आजार असणाऱ्यांचा असेल. यात हृदयविकार, मूत्रपिंड, यकृतविकार व अन्य आजारांचा समावेश असेल. ५ टक्के सहभाग हा आरोग्य कर्मचाऱ्यांचा असेल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा