Advertisement

जुलै-ऑगस्टपर्यंत २५-३० कोटी लोकांना कोरोना लस देण्याचा प्रयत्न

नव्या वर्षात (२०२१) कोरोनाची लस उपलब्ध होणार असून, पहिल्या ३-४ महिन्यांत देशातील नागरिकांसाठी लस उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जुलै-ऑगस्टपर्यंत २५-३० कोटी लोकांना कोरोना लस देण्याचा प्रयत्न
SHARES

मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी, अद्याप या व्हायरसवर औषध उपलब्ध झालेलं नाही. मात्र, नव्या वर्षात (२०२१) कोरोनाची लस उपलब्ध होणार असून, पहिल्या ३-४ महिन्यांत देशातील नागरिकांसाठी लस उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच, जुलै-ऑगस्टपर्यंत जवळपास २५-३० कोटी लोकांना लस देण्याची योजना असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

दिल्लीतील बुराडी येथील निरंकारी समागम मैदानावर आंदोलन करत असलेल्या शेकडो शेतकर्‍यांना कोविडचे नियम पाळण्याची विनंती डॉ. हर्षवर्धन यांनी केली. यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना पुढच्या वर्षी पहिल्या ३-४ महिन्यांत देशातील लोकांना कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसंच, जुलै-ऑगस्टपर्यंत जवळपास २५-३० कोटी लोकांना लस देण्याची योजना असल्याची माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं.

देशात आतापर्यंत एकूण ९४ लाख ३१ हजार ६९२ रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासांत भारतातील ३८ हजार ७७२ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं आहे. तर ४४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच, कोरोनापासून ४५, १५२ लोक बरे झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत १ लाख ३७ हजार १३९ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा