फरार आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या

 Chembur
फरार आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या

गोवंडी - पॅरोलवर बाहेर आल्यानंतर ओळख बदलून राहणाऱ्या आरोपीला गुरूवारी शिवाजी नगर पोलिसांनी अटक केलीय. सचिन शेट्टे असे या आरोपीचं नाव असून तो गेल्या अनेक वर्षांपासून एका हत्येच्या गुन्ह्याखाली नाशिकमध्ये शिक्षा भोगत होता. मात्र पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा तुरुंगात गेलाच नाही. दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी एका छाप्यात या आरोपीला अटक केल्यानंतर त्याने पोलिसांना त्याचे नाव सोहेल असं सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्यात.

Loading Comments