मानखुर्द अपहरण प्रकरणातील पाच मुलांची सुटका

 Mandala
मानखुर्द अपहरण प्रकरणातील पाच मुलांची सुटका
मानखुर्द अपहरण प्रकरणातील पाच मुलांची सुटका
See all

मानखुर्द  - मुलांचं अपहरण करून त्यांची परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीतील दोन महिलांना पोलिसांनी मंगळवारी अटक करत चार मुलांची सुटका केली.

यापूर्वी दीड वर्षांच्या मुलाचं अपहरण करून त्याची अडीच लाखात विक्री करणाऱ्या एका महिला टोळीला 10 डिसेंबरला मानखुर्द पोलिसांनी गोवा येथून अटक करत त्या मुलाची सुटका केली होती. यामध्ये एकूण अटक आरोपींची संख्या 6 असून. यामध्ये पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

या महिलांनी मानखुर्द, उल्हासनगर आणि कल्याण येथून एकूण आठ मुलांचे अपहरण करत त्यांची विविध राज्यांमध्ये विक्री केली आहे. यापैकी एकूण 5 मुलांची पोलिसांनी सुटका करत त्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडे सोपवलं असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली आहे.

Loading Comments