लग्नाचे अामिष दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

  Mankhurd
  लग्नाचे अामिष दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
  मुंबई  -  

  घराशेजारी राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणाने एका 16 वर्षीय मुलीला लग्नाचे अामिष दाखवत तिच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून बलात्कार केल्याची घटना मानखुर्द येथे समोर आली आहे. मानखुर्दच्या साठेनगर परिसरात ही मुलगी राहत असून याच परिसरात आरोपी तरुण रामा यादव (20) हा देखील राहतो. या आरोपीने त्या मुलीला लग्नाचे अामिष दाखवत अनेकदा बलात्कार केला. मुलीच्या वडीलांना याची माहिती मिळताच त्यांनी याबाबत मंगळवारी मानखुर्द पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी देखील तत्काळ बलात्कार आणि बाललैगिंक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीली मंगळवारी रात्री अटक केली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.