दारूच्या परवान्यासाठी तळीरामांची गर्दी

मुंबई विदेशी मद्य नियम, १९५३ अंतर्गत ज्या दारू विक्रेत्यांकडे परवाना आहे, तेच सरकारनं घालून दिलेल्या अटींच्या अधीन राहून दारू घरपोच देऊ शकतात.

दारूच्या परवान्यासाठी तळीरामांची गर्दी
SHARES

लॉकडाऊनच्या काळात सरकारने आता घरपोच दारू विक्राली परवानगी दिली असली. तरी आँनलाईन दारू मागवताना दारू पिण्यासाठी लागणारा परवाना असणे आवश्यक आहे, हे तुम्हाला माहित आहे का? जर हा परवाना नसेल तर तुम्हाला दारू मागवताही येणार नाही आणि स्वतःजवळ बाळगणे हा देखील गुन्हा आहे. सध्या महाराष्ट्रात मद्यउत्पादन, मद्यविक्री आणि मद्यसेवन यासाठी बॉम्बे प्रोहिबिशन अॅक्ट लागू आहे. याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क खाते करते. त्यामुळे मद्यपरवान्यासाठी तळीरामांनी राज्य उत्पादन शुल्कच्या संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचाः- महाराजांबद्दल अपशब्द, मनसेनं केलं खळ खट्याक...

काही दिवसांपूर्वी केंद्रानं दारू विकण्यास परवानगी दिली आणि दारूच्या दुकानांबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली. यातून सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला. हे लक्षात घेऊनच महाराष्ट्र सरकारनं यावर नामी उपाय शोधलाय. दारू घरपोच देण्यास विक्रेत्यांना परवानगी दिलीय. मात्र, यासाठी काही अटीही सरकारनं ठेवल्यात. मुंबई विदेशी मद्य नियम, १९५३ अंतर्गत ज्या दारू विक्रेत्यांकडे परवाना आहे, तेच सरकारनं घालून दिलेल्या अटींच्या अधीन राहून दारू घरपोच देऊ शकतात. गुरूवारी दिवसभरात ४५२५ इतकी दारू घरपोच करण्यात आली आहे.

हेही वाचाः- ठाणे-वाशी लोकल सुरू, ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा

१ एप्रिल ते ११ सप्टेंबरपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मद्य परवान्यासाठी १ लाख ५४ हजार २६९ अर्ज आलेले आहेत. त्यातील १ लाख ४९ हजार ४२९ जणांच्या परवान्यांना मंजूरी देण्यात आली. राज्यात १ एप्रिल ते ८ सप्टेंबरपर्यंत १७ हजार २३६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून ९१९३ इतके गुन्हे नोंदवण्यात आले आहे. तर आतापर्यंत अवैध दारू तस्करी प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १६२६ वाहने जप्त करण्यात एकूण ३९.८३ कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.   

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा