विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला अटक

 Mumbai
विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला अटक

नागपाडा - तरुणीशी अश्लील वर्तन करत तिला ब्लॅकमेल करणाऱ्या एका कॅफे मॅनेजरला नागपाडा पोलिसांनी अटक केलीय. मनीष देसाई असं त्याचं नाव आहे. त्यानं नागपाड्यात राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्याकडून प्रतिसाद मिळत नाही, म्हणताच तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तुझे फोटो वापरून पॉर्न फिल्म तयार करेन, अशी धमकीही त्याने या मुलीला दिली. अखेर या मुलीनं हा प्रकार मनसे उपाध्यक्ष विनोद अरगिले आणि शाखा अध्यक्ष सतिश लाड यांना सांगितला. त्यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर या प्रकरणी तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loading Comments