वाकोलातून १२ कोटींचे ड्रग्ज पकडले

मुंबईत ड्रग तस्करांवर एनसीबीची कारवाई सुरू असताना दुसरीकडे गुन्हे शाखा आणि पोलिसांनीही कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

वाकोलातून १२ कोटींचे ड्रग्ज पकडले
SHARES

मुंबईत ड्रग तस्करांवर एनसीबीची कारवाई सुरू असताना दुसरीकडे गुन्हे शाखा आणि पोलिसांनीही कारवाईचा धडाका सुरू केला आहे. वाकोलामधून तब्बल १२ कोटी रुपयांचा २५ किलो एमडी ड्रगचा साठा पकडला आहे. या प्रकरणी डोंगरी पोलिसांनी दोन तस्करांना अटक केली.

डोंगरी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शबाना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शशिकांत पाडावे, सहायक निरीक्षक प्रकाश लिंगे आणि उपनिरीक्षक द्वारका पोटवडे यांच्या पथकाने १८ फेब्रुवारीला इसाक सय्यद याला १२ ग्रॅम एमडी ड्रगसह पकडले. इसाक याच्या चौकशीमध्ये अब्दुल शेख याचं नाव पुढं आलं. पोलिसांनी अब्दुल शेख याला वाशी येथून ताब्यात घेतलं. यावेळी त्याच्याकडून ५६ ग्रॅम एमडी जप्त केले. तपासात कलिना येथील दीपक बंगेरा याचाही ड्रग तस्करीत सहभाग असल्याचं आढळले.  

दीपक बंगेराला शनिवारी घाटकोपरमधून ताब्यात घेतलं. पोलिसांनी दीपक याच्या वाकोला येथील घराजवळील परिसरात छापा टाकला. यावेळी २५ किलो एमडी ड्रग, पाच लाखांची रोकड, वजन करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन वजन काटे, अंमली पदार्थ पॅक करण्यासाठीच्या पिशव्या हस्तगत करण्यात आल्या.

दीपकच्या वाकोला येथील घरात २५ किलो एमडी ड्रग आले कुठून याचा तपास डोंगरी पोलिस करीत आहेत. दीपकच्या घरातूनच लहान पिशव्यांमध्ये ड्रग किरकोळ पुरवठादारांपर्यंत आणि तेथून सेवन करणाऱ्यांपर्यंत पाठविले जात होते.


हेही वाचा -

बापरे! २ दिवसांत मुंबईतील सील इमारतींची संख्या 'इतकी'

मास्कविना फिरणाऱ्या 'इतक्या' जणांवर कारवाई

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा