दहिसर - घर्टनपाडा आणि जयराजनगर येथे रविवारी रात्री रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या 15 वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून चार जणांना अटक केली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती देताना परिमंडळ 12 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले, या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी दीपक नाराय़ण विशसोबत त्याचे सहकारी अजय, नीलेश मोरे आणि अज्जू यांना अटक केली आहे. हे सर्वजण या परिसरातील टवाळखोर तरुण असून, त्यांनी दारूच्या नशेत ही तोडफोड केली आहे. याबाबत पुढील तपास दहिसर पोलीस करत आहे.