ट्रॉम्बे हल्ल्यात एमआयएम कार्यकर्त्यांना अटक


SHARE

ट्रॉम्बे - फेसबुक पोस्टवरून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यावर हल्ला करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एमआयएमचे कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार रविवारी येथील एमआयएमचे नगरसेवक शहानवाज हुसेन यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर सोमवार आणि मंगळवारी पोलिसांनी 10 ते 12 एमआयएम कार्यकर्त्यांना अटक केली आहे. रविवार आणि सोमवारच्या अटक सत्रानंतर मंगळवारी देखील ट्रॉम्बे पोलिसांनी या हल्ल्यामधील आणखी सात आरोपींना अटक केली असून यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. तर आणखी काही फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या