खड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू

 Chembur
खड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू
खड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू
खड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू
See all

चेंबूर - आर.सी. मार्गावरील नवजीवन सोसायटीच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. सुफियाना शेख असं या चिमुकल्याचं नाव असून तो अडीच वर्षाचा होता. शनिवारी चेंबूरच्या विजयनगर परिसरात राहणाऱ्या त्याच्या मामाकडे तो आई-वडिलांसोबत आला होता.

गेल्या पाच वर्षांपासून आर. सी मार्गावर ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे. त्यामुळे पालिकेने याठिकाणी मोठा खड्डा खोदलेला आहे. त्या रस्त्यावरून जात असताना मुलाचा तोल जाऊन तो या खड्यात पडला. पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ त्याला बाहेर काढले. त्याला परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Loading Comments