चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू

 Mazagaon
चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू

भायखळा - घोडपदेव परिसरातील विघ्नहर्ता इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून पडून एका चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असला तरी यामध्ये अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. मुलीचं नाव मानवी इंगळे असं आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी इमारतीतील दोन महिलांवर संशय व्यक्त केलाय. यातील रेखा नावाची महिला ही दुर्घटनेच्या वेळी व्हरांड्यात असल्याचं मानवीच्या वडिलांना दिसली. तर इमारतीतील दुसऱ्या एका महिलेसोबत इंगळेंचा वाद असल्याचं समोर आलंय. घोडपदेव परिसरातील विघ्नहर्ता इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर अशोक इंगळे हे त्यांच्या कुटुंबियांसह राहतात. अॅटोमोबाईलचा व्यवसाय असलेल्या अशोक इंगळे यांना पाच वर्षांची मानवी नावाची चिमुरडी होती. सोमवारी दुपारी ही चिमुरडी गॅलरीत खेळत असतानाच, अचानक ती वरून खाली पडली. या वेळी मोठा आवाज झाल्यानं, सुरक्षारक्षकानं पाहिले. सुरक्षारक्षकांनं मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पाहताचं लेगच आरडाओरडा केला. तत्काळ जमलेल्या नागरिकांनी तिला केईएम रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Loading Comments