चौथ्या मजल्यावरून पडून 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

  Kandiwali
  चौथ्या मजल्यावरून पडून 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू
  मुंबई  -  

  कांदिवली - पश्चिम परिसरातील शिवाजी रोड इथल्या जय अपार्टमेंटमधील बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरुन 2 वर्षाच्या मुलीचा पडून मृत्यू झाला आहे. याशी शाह असं या मुलीचं नाव आहे. याशी घरातील एका बेडरुममध्ये खेळत होती. खेळता खेळता ती बेडवर चढली. त्यानंतर ती पुढे चालत चालत त्या बेडरुमच्या ओपन खिडकीपर्यंत पोहोचली. कपडे सुकवण्याचे स्टीलच्या ज्या दोन दांड्या असतात, त्या दांड्यामधला गॅप खूप मोठा असल्याने तिचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. हा सर्व प्रकार जेव्हा घडला तेव्हा याशीची आई स्वयंपाक करत होती आणि बाबा हॉलमध्ये काम करत होते. त्यामुळे त्यांना हा घडलेला प्रकार माहित नव्हता. शेजारची एक मुलगी याशीसोबत खेळायला आली होती. तिने हा सर्व प्रकार याशीच्या बाबांना सांगितला. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी एडीआर 36 गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.