वडिलांच्या मित्रानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 Ghatkopar
वडिलांच्या मित्रानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Ghatkopar, Mumbai  -  

घाटकोपरमधील संजय नगर परिसरात राहणाऱ्या एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांच्या मित्राने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी मनोज कमला चौहान (27) या आरोपीला अटक केली आहे.

पीडित मुलीच्या पोटात शनिवारी अचानक दुखू लागल्याने तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी नेले. वैद्यकीय तपासणी केल्यावर मुलगी साडेचार महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी तिच्या पालकांना सांगितले. हे ऐकून पीडित मुलीच्या पालकांना जबर धक्का बसला.

त्यांनी याबाबत मुलीला विचारणा केल्यावर अखेर तिने झालेला संपूर्ण प्रकार पालकांना सांगितला. पीडित मुलीचे कुटुंब आणि आरोपीचे कुटुंब एकमजली घरात रहात होते. पीडित मुलीचे पालक घरात नसल्याचा फायदा घेऊन मनोज तिच्यावर मागील सहा महिन्यांपासून शारीरिक अत्याचार करत होता.

गंभीर बाब म्हणजे मनोजचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालेले असूनसुद्धा त्याचा अत्याचार सुरू होता. पीडित मुलीने हा प्रकार कुणालाही सांगू नये, यासाठी त्याने तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली होती. हा प्रकार उघडकीस आल्यावर पीडित मुलीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनुसार घाटकोपर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून मनोजला रविवारी अटक केली.

मनोजला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
हे देखील वाचा -

'मोक्ष' मिळवून देण्याच्या नावाखाली 'तो' करायचा महिलांसोबत दुष्कृत्य


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Loading Comments