कुरारमध्ये युवतीवर सामूहिक अत्याचार

  Malad
  कुरारमध्ये युवतीवर सामूहिक अत्याचार
  मुंबई  -  

  एका 17 वर्षीय युवतीवर तब्बल सात महिने सामूहिक अत्याचार केल्याची घटना मालाडमधील कुरार परिसरात घडली आहे. हे दुष्कर्म दुसऱ्या तिसऱ्या कुणी केले नसून पीडितेच्या वडिलांच्या दोन मित्रांनीच केले आहे. या पाडित मुलीच्या वडिलांचे दोन वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यावेळी तिला मदत करण्यासाठी हे नराधम पुढे सरसावले आणि याच मदतीचा फायदा घेत या नराधमांनी तिचा फायदा घेत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.

  बाबू मंडल(42) आणि जगरनाथ पांडा(35) असं या नराधमांचं नाव असून, पोलिसांनी या दोघांनाही 375,4,8,12 कलमांतर्गत बेड्या ठोकल्या आहेत.

  पीडित मुलीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने तिच्या आईने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता ती सात महिन्याची गर्भवती असल्याची बाब उघड झाली आणि या नराधमांचे पितळ उघडं पडलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.