चेंबूरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण

 Chembur
चेंबूरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण

दहावीमध्ये शिकणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीला लग्नाचे अमिष दाखवत तिचे अपहरण केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली आहे. याबाबत मुलीच्या आईने सोमवारी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

चेंबूरच्या वाशिका परिसरातील खडीमशीन येथे ही मुलगी, तिची आई, मोठी बहीण आणि आजीसह राहत असून, याच परिसरातील पालिका शाळेत ती दहावीत शिकते. दरम्यान सोमवारी सकाळी ती घरातून अचानक गायब झाली. तिच्या कुटुंबियांनी परिसरात तिचा शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली असता याच परिसरात राहणाऱ्या योगेश वर्मा याच्यासोबत तिला अनेकदा पहिल्याचे तिच्या मैत्रिणीने सांगितले. त्यानुसार त्याच्या घरी देखील विचारपूस केली असता तो देखील गायब असल्याने मुलीच्या आईने आरसीएफ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी देखील अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Loading Comments