SHARE

चेंबूर - लग्नाचं अमिष दाखवून एका 20 वर्षीय तरुणानं 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना चेंबूरमध्ये उघडकीस आलीय. गेल्या सहा महिन्यांपासून या दोघांचे प्रेमसंबध होते. यातूनच या आरोपीनं मुलीवर बलात्कार केला. ही बाब मुलीच्या आईला समजल्यानंतर तिनं आरसीएफ पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केलाय. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीलीप राउत यांनी दिली.

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या