चिमुरडीचे अपहरण करणारे अटकेत

 Churchgate
चिमुरडीचे अपहरण करणारे अटकेत

आझाद मैदान - सात वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या मायलेकींना पोलिसांनी अटक केलीय. या टोळीनं अपहरण केलेल्या चिमुरडीची पोलिसांनी सुटका केलीय. सीतादेवी सहाने (42) आणि पिंकी सहाने (22) अशी मायलेकींची नावं आहेत. सात वर्षांच्या मुलीचा विकण्याचा या आरोपींचा कट होता. पण पोलिसांमुळे तो फसला.

आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जीटी रुग्णालयासमोरून 31 डिसेंबरच्या रात्री वैष्णवी तिच्या घराजवळूनच गायब झाली. वैष्णवी बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या शेजा-यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करत दोघांना अटक केली.

Loading Comments