मुलीचे अपहरण करणारा अटकेत


मुलीचे अपहरण करणारा अटकेत
SHARES

शिवाजीनगर - मुलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. हर्षद शेख (30) असे या आरोपीचे नाव असून तो गर्दुल्ला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोवंडीतल्या शिवाजीनगरमध्ये राहणारी 3 वर्षाची मुलगी घराबाहेर खेळत असताना शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास या आरोपीने मुलीचे अपहरण केले. त्यावेळी आरोपीने मुलीला रिक्षात बसवून नेत असल्याचे काही रहिवाशांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी पाठलाग करत आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र अपहरण करण्यामागचा हेतू आद्यापही स्पष्ट झाला नसून याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमाशंकर ढोळे यांनी दिली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा