पैशासाठी चिमुरडीचं अपहरण करुन हत्या

नागपाडा - खंडणीसाठी साडे तीन वर्षाच्या मुलीचं अपहरण आणि हत्या करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केलीय. हत्या करणारे दोघंही आरोपी अल्पवयीन आहेत. जेनुरा खान असं मृत मुलीचं नाव अाहे. कामाठीपुरामधल्या मौलाना आझाद रोड परिसरात हा मृतदेह शनिवारी मध्यरात्री आढळला. मोबाईल चार्जरच्या केबलनं गळा आवळून जेनुराची हत्या करण्यात आलीय. 19 डिसेंबरला ही मुलगी गायब झाली होती. चिमुरडी गायब झाल्यापासून तिच्या कुटुंबियांकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली जात होती.

Loading Comments