धक्कादायक! अल्पवयीन मुलीसोबत पोलिस शिपायाने केले अश्लील चाळे

अचानक आरोपी पोलिस शिपायाने तिचे तोंड दाबून तिला त्याच्या घरात खेचून दरवाजा लावला.

धक्कादायक! अल्पवयीन मुलीसोबत पोलिस शिपायाने केले अश्लील चाळे
SHARES

एकीकडे महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही पोलिसांवर असते मात्र दुसरीकडे पोलिसानेच अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे केल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमध्ये घडली आहे. तसेच घडलेला प्रकार कुणालाही न सांगणयासाठी पोलिसाने मुलीला धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.  या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी एका २८ वर्षीय पोलिसाला अटक केली आहे.

हेही वाचाः- नव्या वर्षाच्या पहिल्या तारखेपासून सर्वांसाठी लोकल ट्रेन?

पंतनगर परिसरात पीडित मुलगी हि तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तर आरोपी पोलिस शिपाई हा तिच्या शेजारीच राहतो. १४ डिसेंबरच्या सायंकाळी पीडित मुलगी अंगणात तिच्या मैत्रीणींसोबत खेळत होती. खेळून झाल्यानंतर सायंकाळी ६.३० च्या सुमारास ती घरी जात असताना. अचानक आरोपी पोलिस शिपायाने तिचे तोंड दाबून तिला त्याच्या घरात खेचून दरवाजा लावला. त्यानंतर त्याने मुलीला धमकावत तिच्याशी अश्लील चाळे केले. तसेच याबाबत कुणाला सांगितल्यास परिणाम वाईट होतील असे धमकावले. मात्र घाबरलेल्या मुलीने आपल्या घरातल्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.

हेही वाचाः- कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी, 'अशी' देणार लस

मुलीच्या घरातल्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंतनगर पोलिसांनी आरोपी पोलिस शिपायावर  भादंवि कलम ३५४, ३५४(ब), ३४१, ५०६ सह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम ८, १०, १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिस शिपायाला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे. हा पोलिस शिपाई सध्या विलेपार्ले पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. आरोपीला विशेष पोक्सो न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीविरोधात विभागीय कारवाईची शिफारसही करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा