मुलुंडमधलं 'ते' बेपत्ता कुटुंब अजूनही सापडेना

Mulund West
मुलुंडमधलं 'ते' बेपत्ता कुटुंब अजूनही सापडेना
मुलुंडमधलं 'ते' बेपत्ता कुटुंब अजूनही सापडेना
मुलुंडमधलं 'ते' बेपत्ता कुटुंब अजूनही सापडेना
मुलुंडमधलं 'ते' बेपत्ता कुटुंब अजूनही सापडेना
मुलुंडमधलं 'ते' बेपत्ता कुटुंब अजूनही सापडेना
See all
मुंबई  -  

मुलुंड - मणिराम प्रसाद यांच्या बेपत्ता कुटुंबाचे शोधकार्य एक महिना उलटला तरी अजूनही सुरूच आहे. ते मुलुंड (प.) इथल्या इंदिरानगर परिसरातील राहणारे आहेत. 25 फेब्रुवारीला मणिराम यांची पत्नी आणि 3 मुले त्यांच्या राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाल्याचा प्रकार घडला. त्यानंतर मणिराम यांनी आसपास शोध घेतला परंतु काहीच पत्ता लागला नाही. अखेर मणिराम यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु महिना उलटला तरी पोलिसांना शोध घेण्यात यश मिळालेले नाही.

मणिराम आणि त्यांचे कुटुंब आधी पुण्याला राहत असत. परंतु 20 फेब्रुवारीला कामानिमित्त मणिराम कुटुंबासोबत मुंबईमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी इथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. परंतु पाचव्याच दिवशी हा विचित्र प्रकार घडला. 

     मणिराम यांची पत्नी लक्ष्मी प्रसाद (34) 

                                                   मुलगी सोनाली प्रसाद (14)

                                                      मुलगी मोनाली प्रसाद (12) 

                                                      मुलगा हर्ष प्रसाद (10)

कुटुंबातील चारही व्यक्ती अचानक घरातून बेपत्ता झाले. मुलुंड पोलिसांसह पुणे पोलीस देखील त्यांचा शोध घेत आहेत. कुटुंबात काही वाद विवाद होते का ? याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी दिली आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.