अखेर 'त्या' मृतदेहाची ओळख पटली

 Shivaji Nagar
अखेर 'त्या' मृतदेहाची ओळख पटली

शिवाजीनगर - देवनार डंम्पिंग ग्राउंड परिसरात मंगळवारी शिवाजीनगर पोलिसांना एका 55 ते 60 वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटली नव्हती. दरम्यान, शिवाजीनगर परिसरातीलच म्हाडा कॉलनी परिसरात राहणारे अब्दुल करीम शेख हे देखील गेल्या चार दिवसांपासून गायब असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यांनी तत्काळ त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधत त्यांना मृतदेह दाखवला असता तो त्यांचाच मृतदेह असल्याचं स्पष्ट झालं. त्यांना फिटचा त्रास असल्यानं अनेकदा ते रस्त्यात पडायचे. त्यांचा मृत्यूही याच आजारामुळे झाल्याचं शिवाजी नगर पोलिसांनी सांगितलं आहे.

Loading Comments