मोबाइल चोराला पायधुनीतून अटक

 Paydhuni
मोबाइल चोराला पायधुनीतून अटक

पायधुनी - पोलिसांनी गुरुवारी सापळा रचून एका चोराला अटक केल्याने पायधुनी परिसरात खळबळ उडाली आहे. 22 वर्षांच्या समीर केळुस्कर असं या आरोपीचं नाव आहे. वेगवेगळ्या कंपनीचे 53 मोबाइल जप्त केले असून जप्त केलेल्या मोबाइलची किमंत दोन लाख एवढी असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पायधुनी परिसरातील मोहम्मद अली रोडवर एक मोबाइल चोर येणार असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. या आरोपीने मोबाइल नेमके कोठून चोरले आहेत, याचा अधिक तपास सुरू असल्याचं पायधुनी पोलिसांनी सांगितलं.

Loading Comments