चाकू दाखवून पळवला मोबाईल!

 Mumbai
चाकू दाखवून पळवला मोबाईल!

अ‍ॅन्टॉप हिल - रस्त्यावरुन जात असलेल्या विवेक उपाध्याय या 20 वर्षीय तरुणाचा अ‍ॅपल कंपनीचा मोबाईल दोन चोरट्यांनी चाकूच्या धाकात चोरल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. अ‍ॅन्टॉप हिल परिसरात ही घटना घडली आहे. कल्पक नाका परिसरातून हा तरुण जात होता. चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवला आणि ३५ हजार रुपयांचा मोबाईल पळवला. दरम्यान तरुणानं आरडाओरडा केल्यानंतर यातील एका १९ वर्षीय आरोपीला काही रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्याच्या साथीदाराचा शोध सुरु असल्याची माहिती अ‍ॅन्टॉप हिल पोलिसांनी दिली आहे.

Loading Comments