बोरिवलीतून मोबाईल चोराला अटक


बोरिवलीतून मोबाईल चोराला अटक
SHARES

मोबाईलच्या दुकानात चोरी करून फरार झालेल्या आरोपीला बोरिवली पोलिसांनी अटक करत त्याच्याकडील सर्व मोबाईल जप्त केले आहेत. त्याला 12 मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भव्य छोटालाल दवे याचे बोरिवली (प.) जामुनी गलीच्या डी हाऊस ट्युलिप मार्केटिंग नावाचे मोबाईलचे दुकान आहे. आरोपी राहुल राजेश तिवाही त्यांच्याकडे कामाला होता. एके दिवशी मालक नसल्याचा फायदा घेत दुकानातील 31 मोबाईल चोरी करून तो फरार झाला. दुकान मालक भव्य दवे यांनी त्याची तक्रार बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात कलम 381 अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा