तरुणाला लुटणाऱ्या सात जणांना अटक


तरुणाला लुटणाऱ्या सात जणांना अटक
SHARES

कुर्ला - गावावरून परतत असलेल्या दत्ता कारंडे (२८) या तरुणाला मारहाण करत त्याच्याकडील मोबाइल सात आरोपींनी चोरल्याची घटना मंगळवारी पहाटे कुर्ला येथे घडली. आरोपींमध्ये विनोद गोंधळे (२२) याच्यासह सहा अल्पवयीन आरोपी आहेत. हे सर्व आरोपी चेंबूर परिसरातील राहणारे आहेत. या आरोपींनी अशा प्रकारे अनेकांना लुटल्याचा संशय असून चौकशी सुरू असल्याची माहिती नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपर्डे यांनी दिली.

संबंधित विषय