रेल्वेत मोबाइल चोरट्यांचा सुळसुळाट; रोज शेकडो मोबाइल चोरीला

मुंबईच्या लोकल प्रवासात मोबाइल चोरीचं प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीनं वाढलं आहे. प्रवाशांचे मोबाइल हातोहात लंपास करणाऱ्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या तरी जामीनावर बाहेर येऊन त्या पुन्हा सक्रीय होतात.

रेल्वेत मोबाइल चोरट्यांचा सुळसुळाट; रोज शेकडो मोबाइल चोरीला
SHARES

मुंबईकरांच्या आयुष्यात मोबाइल हा एक अविभाज्य घटक बनला आहे. मुंबईत अल्पवयीन मुलं सोडली तर मोबाइल नाही असा माणूस सापडणं फारच कठीण. महागडे मोबाइल वापरण्यात मुंबईकरांचा हात कुणीच धरणार नाही. त्यामुळेच की काय मुंबईत मोबाइलला भरपूर मागणी असल्याचं लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा मुंबईच्या लोकलकडे वळवला आहे. 

मुंबईच्या लोकल प्रवासात मोबाइल चोरीचं प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीनं वाढलं आहे. प्रवाशांचे मोबाइल हातोहात लंपास करणाऱ्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या तरी जामीनावर बाहेर येऊन त्या पुन्हा सक्रीय होतात. 


फटका मारून चोरी

मुंबईच्या लोकलमध्ये दररोज शेकडो मोबाइल चोरीला जातात. काही टोळ्या घोळका करून प्रवाशांच्या खिशातून मोबाइल चोरतात. तर प्रवाशांच्या बॅगवर ब्लेडने वार करून न कळत मोबाइल काढले जातात. रात्रीच्या अंधारात दरवाजात उभ्या असणाऱ्या प्रवाशाच्या हातावर फटका मारून मोबाइल चोरण्याचे प्रकार वाढले आहे. 


सांकेतिक भाषेत अाखणी

विशेष म्हणजे या टोळ्या आपल्या सहकाऱ्यांशी सांकेतिक भाषेत (कोडवर्ड) चोरीबाबत आखणी करतात. उदा. ज्या व्यक्तीचा मोबाइल चोरायचा आहे त्याला कौआ म्हटलं जातं. तर प्रत्यक्ष मोबाइल चोरणाऱ्या चोराला मशीन म्हणून हाक मारली जाते. प्रवाशांचं लक्ष विचलित करणाऱ्या टोळीतल्या सदस्याला ठेकेबाज म्हणतात. ठेकेबाज हा प्रवाशाला भिडतो किंवा त्याच्याशी भांडण करतो. मालखाव म्हणजे चोरीचा मोबाइल ज्याच्याकडं जमा होतो ती व्यक्ती. तर, चोरीच्या मोबाइलचा आयएमईआय क्रमांक बदली करणाऱ्याला माणसाला कलर पलटी म्हणतात.


अनेक टोळ्या कार्यरत 

मोबाइल चोरांच्या संघटीत साम्राज्यात अनेक टोळ्या आहेत. प्रत्येक टोळीची कार्यपद्धती वेगवेगळी आहे. प्रसंगी या टोळ्या प्रवाशांचा जीव घ्यायलाही मागं पुढं पाहत नाही. त्यामुळं लोकलचा प्रवास हा सध्या अतीधोकादायक झाला असल्याचं दादर येथील भूज एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेतून  स्पष्ट झालं आहे. 


रेल्वे प्रवास धोकादायक

मुंबईच्या लोकलमध्ये नोव्हेंबर २०१८ पर्यत १८ हजारहून अधिक मोाबइल चोरीच्या घटना घडल्या आहे. तर मागील वर्षात २० हजार ७६४ मोबाइल चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तर बॅग चोरी करणाऱ्यांच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली आहे. म्हणजेच २०१७ मध्ये १०५१ बॅग चोरीच्या घटना घडल्या असून त्यापैकी ११८ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे. २०१८ मध्ये हे प्रमाण १५०२ वर पोहचलं असून त्यापैकी १३० गुन्हे उघडकीस आणण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास हा आता धोकादायक ठरू लागला असल्याचं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. 



हेही वाचा - 

नक्षलवादी कनेक्शन: तेलतुंबडे यांची गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली

सोहराबुद्दीन चकमक: सर्वच्या सर्व २२ आरोपी दोषमुक्त!




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा