मौज मजेसाठी रुम न दिल्याच्या रागातून कुख्यात गुंडाने हॉटेलमध्ये फेकला पेट्रोल बॉम्ब

मोहम्मद अजीज अबु सालेम खान असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत. आझाद मैदान पोलिस ठाण्यात दाखल दरोडा व हत्येच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली आहे.

मौज मजेसाठी रुम न दिल्याच्या रागातून कुख्यात गुंडाने हॉटेलमध्ये फेकला पेट्रोल बॉम्ब
SHARES
लॉकडाऊनमध्ये अनेक कैद्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार जामीनावर मुक्त केले. माञ मुक्त केलेले हेच कैदी पोलिसांची डोके दुखी ठरू लागलेे आहेत. मौज मजेसाठी हाँटेल मालकाने रुम न दिल्याच्या रागातून कुख्यात गुंडाने हाँटेलमध्ये पेट्रोलबाँम्ब फेकत हाँटेल जाळण्याचा प्रयत्न केला. याा प्रकरणी जे.जे. मार्ग पोलिसांंनी याा गुंडाला अटक केली आहे. अटक आरोपी सराईत असून यापूर्वी त्याच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहे. 

मोहम्मद अजीज अबु सालेम खान असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत. आझाद मैदान पोलिस ठाण्यात दाखल दरोडा व हत्येच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली असून त्याने याप्रकरणी उच्च न्यायालयात अपिल केले आहे. अपिल केल्यामुळे त्याला त्या गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. याशिवाय त्याच्याविरोधात खंडणीचाही गुन्हा दाखल आहे. आरोपी गँगस्टर इजाज लकडावालाचा एकेकाळचा विश्वासू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दोन टाकी परिसरातील खांडीया स्ट्रीट येथे इंदौर लॉजिंग बोर्डींग आहे. 7 मे रोजी तीन व्यक्ती या हॉटेलमध्ये येऊन राहण्यासाठी रुमची मागणी करू लागले. तेव्हा हॉटेलचे मालक अब्दुल्ला करीम यांनी कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी नियमानुसार तुम्हाला रुम देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी मालक अब्दुल यांच्यासोबत आरोपींनी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यांनी अब्दुलला मारहाण केली व तेथून पळून गेले. त्यानंतर दुस-या दिवशी तीन व्यक्ती आले व त्यांच्याकडील पिशवीमध्ये काही स्फोटक जन्य पदार्थ होते. त्याला माचिसने आग लावून आरोपींनी पळ काढला. 

त्या पदार्थामुळे हॉटेलच्या लाकडी दरवाज्याला आग लागली. हॉटेलचे व्यवस्थापक रजनीश मिश्रा याने त्यावेळी प्रसंगावधान राखून अग्नी विरोधक यंत्रणेच्या मदतीने आग विझवली. त्याप्रकरणी जे.जे. मार्ग पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हे कृत्य करणारे व्यक्ती एकमेकांना हाक मारत होते. त्यावरून त्यांची ओळख अजीम भाऊ, जीरा व मोईल बाटला असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीला मित्रासोबत मौजमजा करायची होती. त्यासाठी त्याला हॉटेलमधील रुम हवा असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
Read this story in हिंदी
संबंधित विषय