टीव्ही अभिनेता पार्थ समथानविरुद्ध गुन्हा दाखल

 Bangur Nagar
टीव्ही अभिनेता पार्थ समथानविरुद्ध गुन्हा दाखल
Bangur Nagar, Mumbai  -  

मालाड - 'कैसी ये यारीया' मालिकेतील अभिनेता पार्थ समथान याच्या विरुद्ध एका 20 वर्षीय मॉडेलने दारुच्या नशेत छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. बांगुरनगर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अभिनेता पार्थ समथान आणि सदर मॉडेल हे दोघंही एकमेकांचे मित्र असल्याचंही यादरम्यान समोर आलं आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये एका पार्टीदरम्यान पार्थने नशेत मॉडेलसोबत जबरदस्ती संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पार्थने स्वत:ला टीव्ही अॅक्टर सांगत मुलीला टीव्ही सीरियल मध्ये काम देण्याचं आश्वासन दिलं. पण, घटनेनंतर तो अमेरिकेला निघून गेला.

बांगुरनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी सांगितलं की मालाड पश्चिमच्या एव्हरशाईनमध्ये राहणाऱ्या एका मुलीने स्वत:ला मॉडेल असल्याचं सांगत पार्थच्या विरोधात 14 फेब्रुवारी 2017 ला छेडछाडीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, बांगुरनगर पोलिसांनी 354 ए/ 12 कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन टीव्ही अभिनेता पार्थची चौकशी सुरू केलीय. तर, हे आपल्या विरुद्ध कारस्थान असल्याचं सांगत पार्थने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Loading Comments