रिक्षाच्या प्रवासात तरुणीसोबत अश्लील प्रकार करणाऱ्यास काही तासात अटक

रिक्षाचालकाने आरशात तरुणीला पाहून अश्लील हरकते करू लागला. घाबरलेल्या तरुणीने त्या रिक्षा चालकाचा मोबाइलमध्ये व्हिडओ काढण्यास सुरूवात केली.

रिक्षाच्या प्रवासात तरुणीसोबत अश्लील प्रकार करणाऱ्यास काही तासात अटक
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस रिक्षाचा प्रवास महिलांसाठी असुरक्षित होताना दिसत आहे. नुकताच असा प्रकार गोरेगाव येथे घडला. रिक्षातून प्रवास करताना 18 वर्षीय तरुणीला पाहून अश्लील चाळे केल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणाची माहिती तरुणीने मुंबई पोलिसांच्या ट्विटर वर टाकताच, पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या.

गोरेगाव परिसरात राहणारी 18 वर्षाची पीडित तरुणींने शनिवारी सकाळी काँलेजला जाण्यासाठी आरोपीची. रिक्षा पकडली. त्यावेळी रिक्षाचालक तरुणीला रिक्षाच्या आरशात विचिञ नजरेने पाहू लागला, माञ त्याकडे तरुणीने दुर्लक्ष केले. माञ रिक्षा सिद्धार्थनगर येथील सिग्नलजवळ येताच, रिक्षाचालकाने आरशात तरुणीला पाहून अश्लील हरकते करू लागला. घाबरलेल्या तरुणीने त्या रिक्षा चालकाचा मोबाइलमध्ये व्हिडओ काढण्यास सुरूवात केली. तसेच तरुणीने त्याची तक्रार आणि रिक्षाचा नंबर मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर टाकत तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्हीच्या माध्यमातून आरोपीला अटक केली.या प्रकरणी गोरेगाव पोलिस अधिक तपास करत आहेत.

असाच घाणेरडा प्रकार अभिनेते सुमीत राघवन यांची पत्नी चिन्मयी सुमीत यांना असाच धक्कादायक अनुभव आला आहे. यामध्ये अभिनेत्री चिन्मयी सुमीत विलेपार्लेजवळच्या पार्लेटिळक शाळेजवळ होत्या. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या बीएमडब्ल्यू कारमधील चालकाने चिन्मयी यांच्या समोरच अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.  या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी काही तासांमध्येच बेड्या ठोकल्या आहेत. 
 चिन्मयी त्या चालकाला मारण्यासाठी त्याच्या दिशेने धावल्या होत्या . मात्र हा विकृत  त्यावेळी तो तिथून पळून गेला होता . आरोपीने राखाडी रंगाचा सफारी परिधान केला होता. 1985 हे शेवटचे चार डिजिट आहेत. अभिनेते सुमीत राघवन यांनी यासंबंधी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.  



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा