जुहूतील हाॅटेलमध्ये बाउन्सर महिलेचा विनयभंग

मिश्राने तरुणीला लिफ्टमध्ये बोलावून तिचा हात पकडत तिच्याशी गैरवर्तन केले. एवढ्यावरच न थांबता हाॅटेलमध्ये कार्यरत असलेल्या तिच्या सहकारी मैत्रिणीशीही अर्वाच्च भाषेत बोलला.

जुहूतील हाॅटेलमध्ये बाउन्सर महिलेचा विनयभंग
SHARES

 जुहू येथील आर अड्डा या फोर स्टार हाॅटेलमध्ये बाउन्सर महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यास जुहू पोलिसांनी अटक केली आहे. गैरवर्तन करणारा आरोपी संजय मिश्रा हा देखील याच हाॅटेलमध्ये बाउन्सर म्हणून कामाला आहे. 


लिफ्टमध्ये गैरवर्तन

 आर अड्डा हाॅटेलमध्ये तक्रारदार २९ वर्षीय तरुणी बाउन्सरचे काम करते. तर आरोपी संजय मिश्रा हा तिचाच सहकारी आहे.  मागील अनेक दिवसांपासून तरुणीवर मिश्राची वाईट नजर होती. त्याने तिची अनेकदा छेडही काढली. मात्र त्याकडे तरुणी वेळोवेळी दुर्लक्ष करत होती. शनिवारी हाॅटेलमध्ये ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने तरुणी तेथे कार्यरत होती. त्यावेळी मिश्राने तरुणीला लिफ्टमध्ये बोलावून तिचा हात पकडत तिच्याशी गैरवर्तन केले. एवढ्यावरच न थांबता हाॅटेलमध्ये कार्यरत असलेल्या तिच्या सहकारी मैत्रिणीशीही अर्वाच्च भाषेत बोलला.


जामिनावर मुक्तता

रोजच्या या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने जुहू पोलिस ठाण्यात ३५४ (अ) भा.द.वी. कलमानुसार गुन्हा नोंदवला. या प्रकरणी पोलिसांनी मिश्राला अटक केली. न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.



हेही वाचा -

अनैतिक संबंधाच्या संशयावरून कांदिवलीत पत्नीची हत्या

मुंबईच्या समुद्रात महाराजा जहाजाला आग, चिफ इंजिनीअरचा मृत्यू




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा