डीएनएमुळे चिमुरड्याला मिळाले आई-बाबा

किंग्लसर्कल फलाट क्रमांक एक वर गणपती विसर्जनाच्या दिवशी ३ महिन्यांचं बाळ माहीम दिशेकडील प्रथम श्रेणी डब्यासमोरील बाकड्यांवर ठेवलं होतं. याची माहिती मिळताच वडाळा रेल्वे पोलिसांनी बाळाचा ताबा घेतला होता.

डीएनएमुळे चिमुरड्याला मिळाले आई-बाबा
SHARES

किंग्जसर्कल रेल्वे स्थानकावर विसरलेल्या तीन महिन्यांच्या बाळाला डीएनएमुळे आपले आई-बाबा मिळाले आहेत. बाळ आणि पालकांची डीएनए टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने रेल्वे पोलिसांनी बाळाला आई-वडिलांकडे सोपवलं. 

किंग्लसर्कल फलाट क्रमांक एक वर गणपती विसर्जनाच्या दिवशी ३ महिन्यांचं बाळ माहीम दिशेकडील प्रथम श्रेणी डब्यासमोरील बाकड्यांवर ठेवलं होतं. याची माहिती मिळताच वडाळा रेल्वे पोलिसांनी बाळाचा ताबा घेतला होता. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी बाळाच्या आई-वडिलांचा तपास सुरू केला. त्यानंतर दोन दिवसानंतर कांदिवली पूर्वेकडे राहणाऱ्या कविता सुदाम सिंग, सुदाम रामशंकर सिंग या जोडप्याने बाळ आपलं असल्याचा दावा वडाळा रेल्वे पोलिसांकडे केला होता. गणपती विसर्जनाच्या दिवशी रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी असल्यामुळे बाळाला फलाटावरील बाकड्यावर विसरल्याचं कविता सिंग हिनं पोलिसांना सांगितलं.

मात्र, तिने सांगितलेलं कारण पोलिसांना पटलं नाही. यामुळे वडाळा रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाल आणि पोलीस उप निरीक्षक खिल्लारे यांनी बाळाबाबत हकिकत रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना सांगितली. बाळाची आणि आई-वडिलांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्यानुसार त्यांची डीएनए चाचणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर वडाळा रेल्वे पोलिसांनी बाळाला आई-वडिलांकडे सोपवले.



हेही वाचा -

शिवसेनेच्या उपविभागप्रमुखावर विक्रोळीत गोळीबार

मध्य रेल्वेवरील 'ही' स्थानकं अपघातस्थळं




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा