Advertisement

मध्य रेल्वेवरील 'ही' स्थानकं अपघातस्थळं

मध्य रेल्वे उपनगरी मार्गावर वारंवार अपघात होत असलेल्या ठिकाणांचा रेल्वे सुरक्षा दलानं आढावा घेतला आहे.

मध्य रेल्वेवरील 'ही' स्थानकं अपघातस्थळं
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळं प्रत्येक स्थानकात तुफान गर्दी होत असते. परिणामी या गर्दीमुळं अपघातांची संख्याही वाढत चालली आहे. लोकमधून रेल्वे रुळावर पडणं, स्थानक व लोकलच्या खाली येणं यासारख्या आपघातांमुळं मध्य रेल्वेला आता लाइफलाईन म्हणून नव्हे तर डेथलाइन म्हणून ओळखलं जात आहे. त्यामुळं आता मध्य रेल्वे उपनगरी मार्गावर वारंवार अपघात होत असलेल्या ठिकाणांचा रेल्वे सुरक्षा दलानं आढावा घेतला आहे. या आढव्यानुसार कुर्ला, पारसिक बोगदा, डोंबिवली आणि दिवा ही ठिकाणे धोकादायक असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अपघातांचा आढावा

मध्य रेल्वे सुरक्षा दलानं २०१८ आणि २०१९ मधील रूळ ओलांडणं व लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांचा आढावा घेतला असता त्याचं प्रमाण कमी झालं आहे. मात्र, तरीही काही स्थानकांजवळ या अपघातांत वाढच आहे. कुर्ल्यात लोकलमधून पडून २०१८ मध्ये २ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. २०१९ मध्ये हेच प्रमाण १४ वर गेलं आहे. तर रूळ ओलांडताना मृत्यू झालेल्यांची संख्या ६ वरून १२ वर गेली आहे.

लोकलमधून पडून मृत्यू

दिव्यातही लोकलमधून पडून मृत्यू होण्याचं प्रमाण १ वरून ३ गेलं आहे. डोंबिवली स्थानकाजवळ रूळ ओलांडताना २०१८ मध्ये एकूण ७ अपघात झाले. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. यंदा मृत्यूचं प्रमाण कमी ४ असलं तरी जखमींच्या संख्येत २ वरून ५ अशी वाढ झाली आहे. ठाणे पारसिकजवळही अपघात होण्याचं प्रमाण ४० वरून ४९ असं वाढल्याचं आढळून येत आहे.

प्रवाशांचा मृत्यू

२०१८ च्या तुलनेत यंदा रूळ ओलांडण्याच्या अपघातांत वाढ झाली आहे. २०१८ मध्ये २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर १० प्रवासी जखमी झाले होते. २०१९ मध्ये २५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून जखमी मात्र नाहीत. तर लोकलमधून पडून मृत्यू झाल्याच्या घटनाही २ वरून ३ झाल्या असल्याची माहिती मिळते. त्याशिवाय, ठाणे ते पारसिक बोगदादरम्यान रूळ ओलांडण्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण ३१.३२ टक्क्यांनी कमी, तर लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांत २२.५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.



हेही वाचा -

गॅस गळतीप्रकरणी बीपीसीएलवर मध्य रेल्वे करणार कारवाई

मद्याची ऑनलाइन खरेदी पडते महागात



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा