Advertisement

गॅस गळतीप्रकरणी बीपीसीएलवर मध्य रेल्वे करणार कारवाई

गॅस गळतीप्रकरणी मध्य रेल्वेनं भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेडवर (बीपीसीएल) कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

गॅस गळतीप्रकरणी बीपीसीएलवर मध्य रेल्वे करणार कारवाई
SHARES

मध्य रेल्वे मार्गावर ३ दिवसांपूर्वी गॅस गळतीची घटना घडली होती. या गॅस गळतीप्रकरणी मध्य रेल्वेनं भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेडवर (बीपीसीएल) कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. खर्डी-कसारा दरम्यान गॅस टँकर असलेली मालगाडी खर्डी येथील पंचशील नगर परिसरात सायडिंगसाठी उभी होती. त्यावेळी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पंचशील नगरमधील परिसरात गॅसचा दुर्गंध पसरला. ग्रामस्थांनी एकत्र येत संपूर्ण नगरातील घरांतील गॅसची पाहणी केली. अखेर गॅसचा दुर्गंध रेल्वे रुळांजवळून येत असल्याचं लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

उच्च क्षमतेचा वीजपुरवठा

रेल्वे ओव्हरहेड वायरमध्ये उच्च क्षमतेचा वीजपुरवठा सुरू असताना गळती होत असलेल्या गॅस टँकरची मालगाडी सुरू होती. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळं मोठी दुर्घटना टळली. टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत असल्याचं दिसून आले. याबाबत खर्डी स्थानक व्यवस्थापकाला माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी वाशिंद अग्निशमन दल आणि सिन्नर येथील महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांना धाव घेतली. मात्र, ही गॅस गळती थांबविण्यात त्यांना अपयश आलं.

गॅस गळतीवर नियंत्रण

अखेर ५ तासांनी म्हणजेच दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बीपीसीएल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टँकरमधील वॉल्व बदली करून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गॅस गळतीवर नियंत्रण मिळवलं. बीपीसीएल कंपनीचं एलपीजी गॅसचं टँकर मालगाडीवर होतं. त्यापैकी काही गॅस टँकरमधील झाकणाच्या ठिकाणांहून गॅस गळती होत होती. गॅस गळती संवेदनशील असल्यानं संभाव्य धोका टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.

दंडात्मक कारवाई

या प्रकरणी बीपीसीएल कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. त्याचबरोबर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. गॅस टँकरनं वाहतूक करण्यात येणाऱ्या कंपन्यांशी रेल्वेचा करार असतो. करारात सुरक्षेबाबत सर्व तरतुदी करण्यात आल्या आहेत.



हेही वाचा -

महापालिकेच्या समिती सभागृहातील काच कोसळली, २ अधिकारी जखमी

शरद पवारांचा होणार राऊतांशी ‘सामना’, 'इथं' घेणार मुलाखत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा