Advertisement

शरद पवारांचा होणार राऊतांशी ‘सामना’, 'इथं' घेणार मुलाखत

राज्यात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेआधी वादळी पत्रकार परिषदा घेऊन भाजपला सळो की पळो करून सोडणारे शिवसेना नेते खासदार आता थेट शरद पवारांनाच प्रश्न विचारणार आहेत.

शरद पवारांचा होणार राऊतांशी ‘सामना’, 'इथं' घेणार मुलाखत
SHARES

राज्यात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेआधी वादळी पत्रकार परिषदा घेऊन भाजपला सळो की पळो करून सोडणारे शिवसेना नेते खासदार आता थेट शरद पवारांनाच प्रश्न विचारणार आहेत. पुण्यातील कलावंत साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून या संमेलनात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये रविवार २९ डिसेंबर रोजी हा मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. 

हेही वाचा - केंद्राच्या जीवावर कर्जमाफीची घोषणा केली का? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

महाराष्ट्रात भाजपला बाजूला ठेवून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार स्थापन करण्यात शिवसेनेकडून संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तब्बल महिनाभर हे राजकीय नाट्य सुरू होतं. कधी मुंबईत तर कधी दिल्लीत पडद्यामागे असंख्य हालचाली सुरू होत्या. त्यातच संजय राऊत यांना अचानक आलेलं आजारपण असो किंवा अजित पवार यांनी भाजपकडे जाऊन केलेली सत्ता स्थापना. राज्यातील जनतेलाही या रोलर कोस्टर राईडची मजा अनुभवता आली. 

हेही वाचा - खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर? पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उत

या साऱ्या राजकीय नाट्यावर राऊत आपल्या खुमासदार शैलीतून पवार यांना बोलतं करणार आहेत. त्यामुळे या मुलाखतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा