मद्याची ऑनलाइन खरेदी पडते महागात

मद्याच्या ऑनलाइन खरेदीवेळी अनेक ग्राहकांची फसवणूक होत असल्याची माहिती समोर येत आहे.

मद्याची ऑनलाइन खरेदी पडते महागात
SHARES

घरगुती सामानांपासून प्रत्येक जीवनाश्यक वस्तूंची ऑनलाइन खरेदी करता येते. बाजारात जाऊन खरेदी करण्याच्या वेळेची यामध्ये बचत होत असल्यानं ऑनलाइन खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. घरातील सर्वच वस्तूंबरोबर आता दारुही ऑनलाइन मागवण्याचं प्रमाण वाढलं आहे. मुंबईतल्या उच्चभ्रू भागांमध्ये वाइन, बियर, मद्य अधिक प्रमाणात घरपोच मागवले जाते. मात्र, मद्याच्या ऑनलाइन खरेदीवेळी अनेक ग्राहकांची फसवणूक होत असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत अशाप्रकारे लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.

आर्थिक फसवणूक

मुंबईतील दारुच्या अनेक दुकानांचे गुगलवर संपर्क क्रमांक बदलून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात आहे. दारुच्या दुकानांचा संपर्क क्रमांक शोधण्यासाठी गुगलचा वापर केला जातो. ग्राहक गुगलचा वापर करत असल्यानं चोरट्यांनी ग्राहकांची ऑनलाइन मद्य मागवण्याची ही पद्धत लक्षात घेत विविध वाइन शॉपच्या नावांवर गुगलमध्ये असलेल्या मोबाइल क्रमांकांत फेरफार केले आहेत.

दारू घरपोच

ग्राहकांनी दारू घरपोच मागवण्यासाठी या क्रमांकांवर संपर्क केल्यास त्यांच्याकडून अॅडव्हान्स पेमेंट, डिपॉझिट तसंच, विविध करणं सांगून त्यांच्याकडून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसंच बँकेचा तपशील मागवला जातो आणि त्यामाध्यमातून लाखो रुपये परस्पर काढण्यात येतात. त्यामुळं यामध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते.



हेही वाचा -

मलबार हिलमध्ये कचराकुडीत सापडलं नवजात मूल

शिवसेनेकडून जीवाला धोका : किरीट सोमय्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा