पोटच्या बाळाची किंमत ठरली २.५ लाख...; आईसह ४ एजंटना अटक!

पोटच्या बाळाची किंमत ठरवून त्याती विक्री करणाऱ्या आईला पोलिसांनी ४ एजंटसह अटक केली आहे.

पोटच्या बाळाची किंमत ठरली २.५ लाख...; आईसह ४ एजंटना अटक!
SHARES

पोटच्या बाळाची किंमत ठरवून त्याती विक्री करणाऱ्या आईला पोलिसांनी ४ एजंटसह अटक केली आहे. रहीम शेख असं त्या बाळाच्या आईचं नाव आहे. या बाळाची विक्री अडीच लाख रुपयांना ठरली होती. पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक बनून रंगेहाथ आरोपींना पैसे घेताना अटक केली आहे.

यासंबंधित तक्रार मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. सध्या बाळ भिवंडी येथील बाळ कल्याण समितीकडे देण्यात आल्याचं समजतं.

रहीम शेख हिनं गेल्या १० दिवसांपूर्वी ५वं अपत्य म्हणून मुलीला जन्म दिला होता. पतीपासून विभक्त राहत असल्यानं ५ मुलांचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्न तिच्या समोर होता. यामुळं तिनं पाचवं झालेलं अपत्य विकण्याचा निर्णय घेतला. यातून तिनं बाळ विकणाऱ्या व्यक्तिंचा शोध घेतला आणि यासाठी ४ लोकांची साखळी तयार झाली.

बाळ विकायचे कुणाला असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांनी अनाथ आश्रमात येणाऱ्या व्यक्तींना हेरायचे ठरवलं. अनाथ आश्रमातील मुलांना मदत करण्यासाठी आलेल्या अमृता गुजर शेख यांना आरोपींनी बाळ विक्रीबाबत माहिती दिली.

यातील एका आरोपीनं फिर्यादींना संबंधित बाळ कोणत्याही प्रकारची कायदेशीर प्रक्रिया न करता विकत मिळेल अशी ॲाफर दिली होती. बाळ विक्रीबाबत कळाल्यानंतर जागरुक महिला फिर्यादी अमृता गुजर शेख यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 

पोलिसांनी स्वत: बनावट गिऱ्हाईक बनून बाळ विकत घेण्याचा सापळा रचला. ५ आरोपींनी प्रत्येकी ५० हजार रुपये ठरवून २.५ लाख रुपयांना बाळ विकण्याचं ठरवलं.

नेरुळ रेल्वे स्थानकाशेजारी बाळ विकत घेण्यास बोलविण्यात आले. त्यावेळी रोख ५० हजार स्विकारून बाळाची विक्री करणारी आरोपी माता रहीम शेख आणि इतर चार मध्यस्थी एजंटला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. 


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा